Monday 11 March 2019

जहाज आणि गलबतं

नकोय मला ते जहाज
अजस्त्र, अवाढव्य आणि पोलादी
कप्तानाने रेखलेला जलमार्ग कापत जाणारं
खलाश्यांच्या आशा-आकांक्षांचा कोंडमारा करणारं
दूरवर दिसणाऱ्या महाकाय हिमनगाच्या दिशेने झपाझप वाटचाल करणारं

मला हवी आहेत गलबतं
चहुदिशांना नौकानयन करणारी
आपल्या कामगिरीने क्षितीजं रुंदावणारी
मोडकी, गंजलेली, गळकी, पण सुबक, ना ना रंगांची,
परस्परांशी झुंजणारी, परंतु वादळात मदतीचा हात पुढे सरसावणारी 

A loose translation:

I don't want that enormous, steel ship,  whose course has been set by her captain, whose sailors find their hopes and ambitions stifled, as she progresses with ever increasing velocity towards the imposing iceberg.

I want a bunch of boats that sail in every direction and widen our horizons; small, broken, leaking and yet, beautiful, colourful; boats that fight each other but when the storm hits, don't hesitate to  hold each other's hands.