Tuesday, 23 August 2016

कडेलोट



अक्राळ-विक्राळ डोंगरांमधून
मोडक्या कडेकपारींतून
काढलेला तो सरळसोट द्रुतगती महामार्ग
आणि त्यावरून भरधाव जाणारे
माझे आलिशान वातानुकूलित वाहन
अचानक जेंव्हा टकमक टोकावर जाऊन पोहोचले
आणि रस्ता अंतर्धान पावला---------
मला जाग आली
आणि मी डोळे चोळत पुन्हा
त्या पुस्तकावर नजर टाकली.