अक्राळ-विक्राळ डोंगरांमधून
मोडक्या कडेकपारींतून
काढलेला तो सरळसोट द्रुतगती
महामार्ग
आणि त्यावरून भरधाव जाणारे
माझे आलिशान वातानुकूलित
वाहन
अचानक जेंव्हा टकमक टोकावर
जाऊन पोहोचले
आणि रस्ता अंतर्धान
पावला---------
मला जाग आली
आणि मी डोळे चोळत पुन्हा
त्या पुस्तकावर नजर टाकली.
No comments:
Post a Comment