नाना रानवनी जरी तो फिरला, सर्वस्व
अर्पूनिया
सृष्टीची गुपिते तया उमगली, अज्ञात
का तो तरी?
आग्नेयेत वनी प्रवास करुनी,
वैविध्य न्याहाळूनी
त्याच्याही मनी हे अपत्य वसले,
क्रांतीची नांदी खरी
वार्ता त्याची ही अंग्लादेशी कळता,
धाबे दणाणुनिया
दर्जा दुय्यम हा तयाचि दिधला,
उमराव त्याच्या वरी
झेलोनी अपमान तो वदतसे, “मी काजवा
तो रवी”
शास्त्रज्ञ स्थितप्रज्ञ तो झळकतो,
नभी व्याध ताऱ्यापरि
No comments:
Post a Comment